तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

आजच्या फास्ट टेकनॉलॉजि मध्ये खूप दूरच्या आणि जुन्या मैत्रिणी आणि मित्र यांच्याशी आपण परत भेटतो ... किंवा टाच मध्य राहतो ....
यातच काही संधी साधू नवरे आपली पोळी शेकून घ्यायचा प्रयत्न करतात.

Related image

संशोधनात सिद्ध झाले आहे कि वय वर्ष ३० ते ४० च्या दरम्यान विवाह बाह्य संबंध जास्त चालतात.


काय करणे असू शकतात या मागे .... ?

१) लग्न होऊन साधारण ३-४ वर्षा नंतर त्यातलं नावीन्य संपल्या सारखं वाटत
२) वैवाहिक जीवनात खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतात
३) काही तरी नवीन व रोमांचिक करायचं खूप मन होत
४) पत्नी हि घराच्या कामात व नोकरी संभाळतं पार थकून जाते व पूर्व सारखी किंवा प्रियासी सारखी प्रेम करू शकत नाही
५) मोठा परिवार असल्यास नाते संबंधात मोकळीक मिळत नाही
६) मुलांची जबाबदारी वाढते
७) आणि काही पुरुषांच्या बाबतीत " जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही " हीच गत
८) तर काही पुरुषांच्या मनात येते कि " मी आता माझी सगळी जबाबदारी नीट पडली आहे तर आता मला माझ्या मन सारखं जगायचं हक्क आहे "
९) काहींच्या बाबत त्यांची ती लैंगिक गरज होऊन जाते , जी कि घरी पूर्ण होत नाही.

Related image

असे नाही कि स्त्रियांच्या बाबत हे घडत नाही पण त्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी आहे . त्या मागे कारण त्यांची समाजाकडे पाहण्याची नजर असू शकेल , त्यांचे परिवारावर असलेलं प्रेम असू शकेल , त्यांच्याकडे वेळ अपुरा पडत असेल (कामे संपवून)  किंवा त्यांची विवेक बुद्धी. काहीही असू शकते ...

Image result for POST marriage affairs

कसे कळेल कि तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना ?

१) जर तुमचे वारंवार छोट्या छोट्या गोष्टीं वरून वाद होऊ लागले
२) जर नवरा तुमची दुसऱ्या स्त्रियां सोबत तुलना करू लागला
३) वारंवार तुम्ही किती जाड , किती बारीक, किती उंच, किती ठेंगू , किती आळशी ... अश्या प्रकारच्या कोट्या ऐकू येऊ लागल्या
४) नवऱ्याचे लक्ष तुमच्याकडे किंवा परिवाराकडे कमी आणि फोन मध्ये जास्त असल्यास
५) अशी कोणतीच गोष्ट नाही जी कि नवरा बायकोच्या नात्यात बोलली जात नाही , असे असून विनाकारण फोन ला पिन कोड किंवा लॉक करून ठेवणे
६) तुम्ही आसपास नसताना बोलणे आणि आल्याचं काळातच फोन ठेवून देणे.
७) कोणते मिस्ड कॉल्स आल्यास लागलीच कॉल ना करणे , तुमच्या मागून बोलणे .... (बहुदा नंबर वेगळ्याच नावाने साठवलेले असतात )
८) तुमची शाररिक गरज पूर्ण न करणे , आणि तसे व्यक्त केल्यास , तुम्ही किती चुकीच्या आणि घाणेरड्या विचाराच्या आहेत हे पटवून देणे.
९) तुम्हाला वेळ न देणे
१०) दहा मिनिटाच्या कामासाठी खाली गेल्यास ३० मिनिटे लावणे
११) ऑफिस मध्ये जास्त वेळ काढणे
१२) ऑफिस च्या कामासाठी फिरणे , अचानक वाढू लागणे
१३) घरी पैसे कमी देणे


तर काही केसेस मध्ये (अति शहाणे नवरे , तुम्ही संशय घेऊ नये म्हणून )

१) खूप प्रेम असल्याचे दाखवणे
२) छान गिफ्ट्स देणे
३) तुम्हाला फिरायला नेले असता मोबाइलला नेट बंद करून ठेवणे ( व्हॉट'स अँप करून चेक करा)
४) फिरायला किंवा मूवी ला गेले असता इंटर्वल मध्ये गपचूप बोलणे
५) असे मित्र ठेवणे जे कि त्यांच्या या कुकर्मात सामील असतील

अशा प्रकारे बऱ्याच पद्धती आजमावून नवरे आपल्या बायकोला फसवतात ... तेंव्हा सतर्क व्हा ...
उगाच संशय घेऊन क्लेश करून घेऊ नका , पण अगदीच डोळेझाक करून विश्वास ठेवू नका.


*********************************************************************************



Comments

Popular posts from this blog

आठवण

अवघ्या विश्वात