आठवण

आठवण


सांग ना सजना , का छळते याद ही ...
विव्हळूनी जीव हा, का जाते जाण ही ||
एक एक दिस मज युगा सम भासे
रात्रीचे काय सांगू ? तळमळू जीव लागे ||
आठवणीत तुझ्या सरता सरे दिस ना
रात्रीचे काय करावे? मज काही बघ सुचेना ||
ढाळीत मूक अश्रू....... रात्र पुढे सरते .....
माझे मज कळेना, का मन हे गलबलते ||
येशील केंव्हा प्रिया तू? मी रोज वाट पाहते
रोज दिस ढळतो , पण वाट ना ही सरते ||
तुज विन दूर देशी एक दिस ही न जावे
हीच मनीषा असता, का जीवनात हे घडावे? ||
दोघांचा संसार तो .... कसा रमणीय होता ...
सुखानेही लोटांगण घ्यावे, एक आलिंगण ते पाता ||
आयुष्यात प्रत्येकाच्या नसतील सुखाचे तारे
या दुखा: पाठवणी करत , घर सुखाने भरावे ||
येशील परतुनी तू ....तो स्वर्ण दिस असे मजला
नेत्रांच्या ज्योतिनी मी ओवाळीन नाथा तुजला ||

सौ प्रगती कांबळी

Comments

Popular posts from this blog

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

अवघ्या विश्वात