नवरा/ बायको मला फसवतो/ फसवते ,म्हणून मी पण तेच करणार .... किती योग्य आणि किती अयोग्य ?
नवरा/ बायको मला फसवतो/ फसवते ,म्हणून मी पण तेच करणार .... किती योग्य आणि किती अयोग्य ? बऱ्याच वेळा रागाच्या भरात आपण असे निर्णय घेतो जे बरोबर असतीलच असे नाही; पण परिस्थिती आपणास असे निर्णय घेण्यास जर भाग पडत असेल तर ....? आजकाल लग्ना नंतर होणारे अफेअर्स हि बाब खूपच कॉमन झाली आहे .... प्रत्येक घरात या ना त्या कारणाने हे ऐकू येतेच .... जोवर स्वतःवर हि परिस्थिती येत नाही तोवर त्याचा परिणाम किती भयानक आहे आणि न दिसणाऱ्या त्या जखमा किती खोलवर रुतून राहिल्या आहे हे कळण जरा मुश्कीलच .... जेंव्हा आपणास कळत कि आपण फसवले गेलो आहे तेंव्हा हा घाव भरणं खूप गरजेचं आहे .... त्यातून बाहेर पडण गरजेच आहे ... तू केलं म्हणून आता मी करणार असे करून कसे चालेल .... त्यात जर का मुले असतील तर त्यांचा विचार पहिला करावा .... जे पालक आपल्या स्वार्था पोटी असे प्रकार करतात ... आता जरी मुले लहान असली तरी त्यांना कधी ना कधी हि कहाणी कळणारच ... घरातलं प्रदूषित वातावरण हे जाणवणारच .... अशी मुले त्यांच्या लहान वयात लैंगिक शोषणाचे बळी ठरतात ... कारण त्यांच...