नवरा/ बायको मला फसवतो/ फसवते ,म्हणून मी पण तेच करणार .... किती योग्य आणि किती अयोग्य ?
नवरा/ बायको मला फसवतो/ फसवते ,म्हणून मी पण तेच करणार ....
किती योग्य आणि किती अयोग्य ?
बऱ्याच वेळा रागाच्या भरात आपण असे निर्णय घेतो जे बरोबर असतीलच असे नाही; पण परिस्थिती आपणास असे निर्णय घेण्यास जर भाग पडत असेल तर ....?
आजकाल लग्ना नंतर होणारे अफेअर्स हि बाब खूपच कॉमन झाली आहे .... प्रत्येक घरात या ना त्या कारणाने हे ऐकू येतेच ....
जोवर स्वतःवर हि परिस्थिती येत नाही तोवर त्याचा परिणाम किती भयानक आहे आणि न दिसणाऱ्या त्या जखमा किती खोलवर रुतून राहिल्या आहे हे कळण जरा मुश्कीलच ....
जेंव्हा आपणास कळत कि आपण फसवले गेलो आहे तेंव्हा हा घाव भरणं खूप गरजेचं आहे .... त्यातून बाहेर पडण गरजेच आहे ... तू केलं म्हणून आता मी करणार असे करून कसे चालेल .... त्यात जर का मुले असतील तर त्यांचा विचार पहिला करावा ....
जे पालक आपल्या स्वार्था पोटी असे प्रकार करतात ... आता जरी मुले लहान असली तरी त्यांना कधी ना कधी हि कहाणी कळणारच ... घरातलं प्रदूषित वातावरण हे जाणवणारच .... अशी मुले त्यांच्या लहान वयात लैंगिक शोषणाचे बळी ठरतात ... कारण त्यांचे पालक स्वतः च्या सो कोल्ड LIFE मध्ये busy असतात.... या मुलांची वाढ वेगळीच होते ... त्यांच्या साठी एकतर असे वागणे कॉमन होते किंवा त्यांच्या मनातून आपल्या संस्कृतीची पाळे मुळे नष्ट होतात . त्यांचा लग्न या संकल्पनेवरून विश्वास उडतो.
पालक म्हणून तरी याचा आपण विचार करावाच लागेल.
काहींच्या मते "मी माझे पालकत्व नीट पार पडत आहे आणि माझी खाजगी life सुद्धा बॅलन्स करत आहे ". खरंच कितपत खर आहे ?... याचा एकदा पुन्हा विचार करा.
माझ्या काही मैत्रिणीच्या बाबत असे झाले कि "नवरा अगदी रंगे हात पकडला जाऊन देखील शिरजोर राहिला" काय बोलावे अश्या माणसांना हेच कळत नाही. एक ना दोन, अशी माझ्या कडे ५/६ उदाहरणे आहेत . आता पर्याय म्हणून त्या पण तसेच वागू लागल्या . वयक्तिक मला हे पटत नाही ... पण प्रत्येकाची वेग वेगळी गरज असते ...
कोणाला प्रेम हवे असते , कोणाला पैसा , कोणाला चैनी आयुष्य , कोणाला शाररिक गरज , कोणाला जीवनात महत्व हवे असते तर कोणाला फक्त वेळ ... प्रत्येकाची आवड निवड वेगळी ... या गरजा जेंव्हा आपल्या जोडीदाराकडून पूर्ण होत नाही अथवा नाकारल्या जातात तेंव्हा विवाह बाह्य संबंध होतात .
आणि नवऱ्याने दुर्लक्षित केल्याने , आधीच तुटलेलं मन अजून खचून जात आणि आधार शोधू लागत ... यात चुकीचं असं काहीच नाही ... अगदी नैसर्गिक आहे हि प्रक्रिया. पण अश्या वेळी खंबीर राहून जे तुम्हाला आवडत त्याला प्राधान्य द्या .... जस कि कोणाला वाचन आवडत कोणाला गाणी ऐकणं , कोणाला वाद्य वाजवणे , कोणाला लिहिणे .... काही ना काही जी तुमची आवड होती आणि तुम्ही संसाराच्या राहत गाडग्यात कुठे तरी हरवून बसलात ते शोधा आणि जोपासा...
स्वतः मध्ये असे चांगले आणि अनपेक्षित बदल आणा कि जे तुमच्या जोडीदारास पुनर्विचार करण्यास भाग पडतील. आयुष्य तुमचे आहे निर्णय देखील तुमचे असतील ... पण अश्या वेळीस मार्गदर्शनाची खूप गरज असते. चुकीच्या निर्णयांनी तुमच्या नात्यातला विश्वास कायमचा तुटू शकतो.
स्वतः मध्ये असे चांगले आणि अनपेक्षित बदल आणा कि जे तुमच्या जोडीदारास पुनर्विचार करण्यास भाग पडतील. आयुष्य तुमचे आहे निर्णय देखील तुमचे असतील ... पण अश्या वेळीस मार्गदर्शनाची खूप गरज असते. चुकीच्या निर्णयांनी तुमच्या नात्यातला विश्वास कायमचा तुटू शकतो.
पुरेसा वेळ जाऊ देणं गरजेचं आहे ... चिंतन कारण गरजेचं आहे ....
पुन्हा विचार करा आणि सुखी आयुष्य निवडा ...
तुमच्या मुलाबाळान साठी सुंदर भविष्याची निर्मिती करा


Comments
Post a Comment