अवघ्या विश्वात

अवघ्या विश्वात

स्वप्नाच्या या विश्वात
तुझे सुरेख रूप भावले ...
हृदयाच्या कप्प्यात 
ते मी साठवून ठेवले 

प्रेमाच्या विश्वात
तुझे गोड शब्द आवडले.....
कळत नकळत कधी
वेडे मन माझे गुंतले ....

देहाच्या या विश्वात
तुझे स्पर्श धुंध झाले
जणू त्या स्पर्शाने
अवघे जीवन सार्थक झाले ....

जीवनाच्या या वाटेवर
तुझे कडवे बोल झोंबले
मनातल्या मनात
शब्दन-शब्द माझे फिरले ....

आठवणीच्या विश्वात
तुझे भावूक बोल आठवले
त्या सूचक बोलात
तन - मन माझे रमले ....

शेवटच्या क्षणी
तुझे अंधुक दर्शन झाले
काहीच न सांगता
बरेच काही उमगून गेले ......

- सौ प्रगती कांबळी

Comments

Popular posts from this blog

आठवण

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....