चित्रकला
चित्रकला
पाचवीतल्या वर्गातला चित्रकलेचा तो तास होता
चिमुकल्या माझ्यासाठी तो खूप खास होता... ||
कलेची आवड कधी लहानपणीच रुजली
रंग - संगतीची जाण देखील तेंव्हाच उमजली ||
नीर-निराळे रंग, अन रंगाचे ते प्रकार
अनेक विविध कुंचले अन निरनिराळे आकार ||
वेळ कधी- केंव्हा- कसा निघून जाई पटकन
लक्षात येई तेंव्हा, जेंव्हा धपाटा पडे धपकन ||
आई म्हणे , "अग पोरी , अभ्यासातही हवी गोडी"
काहीच न उमगे मला, होते मी कला वेडी ||
प्रत्येक वेळी निरनिराळ्या रंगासाठी हट्ट होता
घरातल्या भितींचाही कलेला माझ्या पाठींबा होता ||
शाळेतली वर्षे कशी सुळकन निघून गेली
दहावीच्या वर्गात कलेची सोबत अलगत सुटली ||
अशीच कित्ती वर्षे भुर्कन उडुनी गेली
चित्रकलेची आवड देखील धुरकट होत गेली ||
सहज एकदा काही दिवस गेले होते माहेरी
घरातही चालू होती शिफ्टिंग ची तयारी ||
अडगळीच्या जागेत मदद गेले करायला
जरुरीच्या सामानाची जुळवा जुळव पाहायला ||
रिकाम्या एका बाटली कडे लक्ष गेले चुकून
बाटलीतला सफेद रंग गेला होता सुकून ||
रंग पाहुनी डोळ्यात , आसवे दाटुनी आली
मी दुर्लक्ष केल्यानेच रंगांची आबाळ झाली ||
हीच असते कथा शंभरातून नवद्दांची
आपणच देतो आहुती आपल्यातल्या कलेची ||
सौ प्रगती कांबळी
Comments
Post a Comment