लव कम अरेंज मेरेज

लव कम अरेंज मेरेज



लव मेरेज करताना एक वेगळीच मजा असते 
"आपण आता एक होणार" याचीच नशा असते


माहेर सोडून जाताना, काहीच कसे वाटत नाही 
सासरची माणसे देखील, आपली कधी भासत नाही 


आधीच माहेरी ओळख परेड झालेली असते
सासरच्यांच्या परवानगीने, पाऊल पुढे पडते 


नवरोबा तर गुढघ्याला बाशिंग बांधून उभा असतो
नवरीला तर नटण्यासाठी वेळ अपुरा पडतो 


दोन जीव एक होताना, दोन कुटुंबे एक होतात 
राग लोभ सोडून आनंदात सामील होतात 


किती स्वपे पहिली असतात या दोन जीवांनी
आयुष्य पटावर आता नाटक सदर होते नव्याने 


नव्याची नवलाई फार काळ टिकत नाही
"आपल आता पहिल्यासारख फारस पटत नाही"


वाद विवाद तंटे आणि टोकाचे ते झगडे 
कोर्ट- कचेरी, वकील आणि घटस्फोटाचे ते लफडे 


तुझ्या माझ्या घरच्यांवरून नेहमीच होतात वाद 
"तू श्रेष्ठ?" कि "मी श्रेष्ठ!" याचाच घरात नाद 


या सगळ्या वादाचे परिणाम वाईटच होतात 
अशीच हि लव कम अरेंज मेरेज होतात


आहे यावर उपाय मोलाचा एकच खास 
तोच सोडवू शकेल तुमच्या संसाराचा गळफास 


संसाराची प्रेम गाडी मिळून दोघांनी ढकलावी 
सोबती थकल्यावर दुसऱ्याने सावली द्यावी 


जीवनाचा मूलमंत्र आहे आनंदी आनंद
दुसऱ्याच्या सुखात शोधावा आपला स्वानंद 

- सौ प्रगती कांबळी 

Comments

Popular posts from this blog

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

आठवण

अवघ्या विश्वात