आई
आई
कल्पनेने तुझ्या
माझे मन पुलकित होते
आनंदाच्या हिंदोळ्यावर
उंच झोके घेते .........
विचार तुझा
माझ्या मनी मी करते
मनात आठवणींची
गर्दीच गर्दी होते ...........
नकळत डोळ्यातुनी या
नदी वाहू पाहते
आठवणींची तुझ्या
गोड स्मृती उमटते ...........
कधी दटावले
कधी लाडावलेले
आनंदी दिस ते
मी शोधीत आता असते ........
- सौ प्रगती कांबळी
Comments
Post a Comment