जन्म
जन्म
आकाशात काळे ढग जमा झाले
एका क्षणात अंधारुनी आले
काय झाले मज न कळले
हवेच्या माऱ्याने वेडे झाड झुलले ||
काय हा झोंबरा वारा
त्यातही या कोसळती गारा
पाने उडती पहा भरारा
नृत्य करिती या जलधारा ||
सारे निवले, शांत झाले
सारेच जीव गारठलेले
बीज वेडे धरणीवर पडलेले
मातेच्या कुशीत अंकुरलेले ||
- सौ प्रगती कांबळी
Comments
Post a Comment