लग्नाची गंमत

लग्नाची गंमत काय सांगू तुम्हाला
इथे दोन्हीहि जीवांची नेहमीच होते तूला

नवीन नवीन असताना वाटते सगळेच गोड
एक वर्ष सरता सरता होतो सगळा घोळ

नव्याची नवलाई कशी भुर्कन उडून जाते
आता हळूच पाहुलाने बाळ चाहूल देते

येते संसारात आता वेगळीच मजा
आता न ती राणी आणि न तो राजा

बाळा पुढे तिला काहीच सुचत नाही
त्याचे हि चालू असते वेगळेच काही

लहानग्या जीवात गुरफटतात जीव
हीच असते भावी आयुष्याची निव

वर्षा मागे वर्षे कशी पटकन जातात
आणि आपल्या ओंजळीत आठवणी राहतात

आला पुन्हा फिरून हा मंगल दिवस
आज आहे तुमच्या लग्नाचा वाढदिवस

आजच्या दिवशी किती स्वप्ने रंगली होती
त्यात काही सत्यात उतरली तर काही हवेत विरली

आज पुन्हा बसा निवांत घेवून हाती हात
व्यक्त करा तुमच्या मनातली खास बात

पुन्हा जगा दोन क्षण एकमेंका साठी
बाकी नाती आहेतच आयुष्य भरा साठी

अशीच अनेक सुखद वर्षे येओ तुम्हा साठी
लग्नाच्या शुभेच्छा आहे आमच्या ओठी

_______________________________

सौ प्रगती नंदकिशोर कांबळी

Comments

Popular posts from this blog

आठवण

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

अवघ्या विश्वात