आठवण सांग ना सजना , का छळते याद ही ... विव्हळूनी जीव हा , का जाते जाण ही || एक एक दिस मज युगा सम भासे रात्रीचे काय सांगू ? तळमळू जीव लागे || आठवणीत तुझ्या सरता सरे दिस ना रात्रीचे काय करावे ? मज काही बघ सुचेना || ढाळीत मूक अश्रू....... रात्र पुढे सरते ..... माझे मज कळेना , का मन हे गलबलते || येशील केंव्हा प्रिया तू ? मी रोज वाट पाहते रोज दिस ढळतो , पण वाट ना ही सरते || तुज विन दूर देशी एक दिस ही न जावे हीच मनीषा असता , का जीवनात हे घडावे ? || दोघांचा संसार तो .... कसा रमणीय होता ... सुखानेही लोटांगण घ्यावे , एक आलिंगण ते पाता || आयुष्यात प्रत्येकाच्या नसतील सुखाचे तारे या दुखा: पाठवणी करत , घर सुखाने भरावे || येशील परतुनी तू ....तो स्वर्ण दिस असे मजला नेत्रांच्या ज्योतिनी मी ओवाळीन नाथा तुजला || सौ प्रगती कांबळी
Comments
Post a Comment