|| कोंडमारा ||
|| कोंडमारा ||
कोणी काही बोलले तरी आता काही वाटत नाही ||
माझे मन शांत कराया समोर कुणीच दिसत नाही ||
कोण सांगू ? काय सांगू? कोणीच माझे नाही ||
एक तूच होतास जिवलग, तुला किमत कळली नाही ||
रड - रडून आता शरीरात जोर उरला नाही ||
आणखी घाव सह्न्याच हि धीर माझ्यात नाही ||
मनातल्या माझ्या प्रेमालाच लावलास तू चूड ||
खोलवर कुठे गाडले गेले; मनातलं ते गूढ ||
थकुनी गेले डोळे..... अन अश्रू हि आटले...... ||
माझ्या डोळ्यातील आसवांची तू कदर केली नाही ||
किती आर्जवे केली तरी, मागे फिरला नाही ||
तुझ्या वाचुनी माझ्या मनास विचार दुसरा नाही ||
"तू तिथे मी" अन्यथा जगण्या अर्थ नाही ||
पामरांच्या वागण्याचा अर्थ तू जाणुनी घे ||
कसा विश्वास देऊ तुला ? मी तुझीच आहे रे ||
एकालाच चमकण्यात काय सुखी असे ध्रुव तारा ||
तसेच झाले माझेही .. समज माझा कोंडमारा ||

सौ प्रगती कांबळी
Comments
Post a Comment