दखल

दखल 


रोज रात्री स्वप्नात, राजकुमार तिला भेटत होता
दिवसा देखील तिच्या मनावर त्याचाच ताबा होता 


खुपदा ठरवलं तिने, " सांगेन त्याला मी आज!"
"हृदयाचा माझ्या ठाव घेणारा तूच आहे तो नेमबाज


विचारा खेरीज त्याच्या तिचा जाईना दिवस
प्रेमासाठी त्याच्या , तिने कित्ती केले नवस 


धाडस खूप करून एकदा तिने प्रेमपत्र लिहिले 
त्याच्या हाती पोह्चाण्या आधी मास्तरांनी वाचले


प्रेमपत्राची वरात निघाली तिच्या सह घरी
बाबा म्हणाले "अशी मुलगी नसलेलीच बरी "


अशीच एकदा वर्गात ती एकटीच बसलेली होती 
तो वर्गात आला म्हणून त्याच्याशी हसली होती 


गोड तिच्या हसण्याला प्रतिसाद त्याने नाही दिला
तो म्हणे मी आणि अभ्यास माझा भला 


आतुर उमलण्या होती कळी, पण पहाट झाली नाही 
प्रेमासाठी वेड्या जीवाची त्याने दखल घेतली नाही 

- सौ प्रगती कांबळी 

Comments

Popular posts from this blog

तुमचा नवरा तुम्हाला फसवत तर नाही ना? .... कस कळेल ..... ? वाचा इथे .....

आठवण

अवघ्या विश्वात